Author name: whm editor

प्रशालेतील विद्यार्थ्यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (NIV) भेट

दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी  विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. या शैक्षणिक भेटीमध्ये  इयत्ता ९ वी ते १२ वी मधील एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना “Spend One Day as a Scientist in ICMR” या थीम अंतर्गत वैज्ञानिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सोबत मार्गदर्शक […]

प्रशालेतील विद्यार्थ्यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (NIV) भेट Read More »

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील शिक्षक देशराज कोळंबे , संगीता रामदासी, संगीता रिकामे, चंद्रकांत भोकटे , सूर्यकांत खैरनार, माने.एस. ए. तसेच सेवक महादेव भांडवलकर,वैभव म्हेत्रे ,शारदा सोळंके यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले. इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी अनुप्रिया पाडळकर हिने लोकमान्य टिळकांच्या  ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम Read More »

शंकर पाटलांच्या जन्मशताब्दीनिमित्त कथावाचनाचा उपक्रम

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कथाकार शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रशालेत  दि ३१ जुलै २०२६ रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शंकर पाटील यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे तसेच त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे हा होता. प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सौ. गद्रे मॅडम, सौ. चिंबळकर मॅडम

शंकर पाटलांच्या जन्मशताब्दीनिमित्त कथावाचनाचा उपक्रम Read More »

गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम

भारतीय संस्कृतीत गुरुंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:…” या उक्तीप्रमाणे गुरुंचे ऋण फेडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर, प्रमुख पाहुण्या सौ.किशोरी पवार ,मान्यवर शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना प्रार्थना सादर केली.त्यानंतर प्रांजल खैरनार हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक

गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम Read More »

शालामाता कृतज्ञता सोहळा

दिनांक २९ जुलै २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड या प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त “शालामाता कृतज्ञता अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी रोटरी क्लब चे अध्यक्ष मा. डॉ. संदीप टिळेकर, सासवड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मा. श्री. मिलिंद इनामके, वरद टोपोग्राफिकल मॅपिंग सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. मनोज

शालामाता कृतज्ञता सोहळा Read More »

शालेय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

दिनांक १५ जुलै २०२६ रोजी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता निहाय वेगवेगळे विषय देण्यात आलेले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सौ. गावीत, कु.न्हालवे, सौ. जगताप या शिक्षिकांनी केले. स्पर्धेचे नियोजन सौ.घोलप व सौ.सहारे यांनी केले. प्रशालेचे मा.उपमुख्याध्यापक श्री.सुरवसे सर यांच्या

शालेय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन Read More »

विद्यालयात कारगिल विजय दिवसाचे आयोजन

भारतात सर्वत्र २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज दिनांक २७ जुलै २०२६ रोजी आपल्या प्रशालेतही हा दिवस साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लहाने सर यांनी केले. १९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला. त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून त्यांना

विद्यालयात कारगिल विजय दिवसाचे आयोजन Read More »

लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम

स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज दि. 23 जुलै 2026 रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” हा त्यांचा सिंहनाद आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती जागृत करतो. नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्या शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ५

लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम Read More »

वाघीरे विद्यालयात महाराष्ट्राचे पूर्व-उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांची जयंती साजरी

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती आज दि. २२ जुलै २०२६ रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली. तळागाळातील नेता, शिस्तबद्ध प्रशासक व धडाडीचे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्यासाठी आपल्या शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ७ वी तक्षशिला मधील कु.प्रणया

वाघीरे विद्यालयात महाराष्ट्राचे पूर्व-उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांची जयंती साजरी Read More »

शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल प्रशालेचा पुरस्काराने गौरव

  सासवड येथील ‘अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य ‘सन्मान पुरस्कार व बक्षीस वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (कुंजीरवाडा मेन रोड, सासवड) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सासवडच्या नगराध्यक्षा मा. श्रीमती आनंदी चंदुकाका जगताप यांनी भूषवले.

शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल प्रशालेचा पुरस्काराने गौरव Read More »

Scroll to Top