मुख्याध्यापकीय मनोगत

नमस्कार,

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना १८६० साली आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,कै.वामन भावे , कै. लक्ष्मण इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात आली. या वर्षी संस्था शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असून संस्थेस सन २०१९ -२०२० या वर्षी १६० वर्षे पूर्ण होत आहेत.संस्थेच्या शाखांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रांत झालेला आहे.

ग्रामिण भागात सासवड येथे राष्ट्रिय शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने सन १९०६ साली म. ए. सो. वाघीरे विद्यालय सुरू केले असून शाळा ११५ वर्षे ज्ञानदानाचे कार्य अखंंडपणे चालू आहे.

म. ए. सो. वाघीरे विद्यालय पुरदंर तालुक्यातील जुनी व नामवंत शाळेला ऐतिहासिक परंपरा असून या शाळेत आचार्य प्र. के. अत्रे ते आजचे महाराष्ट्र राज्य मा. शिक्षण आयुक्त श्री. विशाल सोळंकी सारखे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्य करीत आहेत. यांचा अभिमान शाळेला आहे.

शाळेला सतत संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, पालक व हितचिंतक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

प्रशालेची वेबसाईडच्या माध्यमातून शाळेचे विविध उपक्रम, शाळेने विविध क्षेत्रात मिळविलेले यश, शाळेचा इतिहास, शाळेची विविध गुणवैशिष्ट्ये, शाळेची आधुनिकीकरणाकडे चाललेली वाटचाल अशा अनेक बाबी आपणाला आपल्या शाळेबाबत शाळेचे आजी माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक यांचेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने भविष्यकाळात शाळेचा ऐतिहासिक वारसा पुढे चालू ठेवण्याचा व उज्वल करण्याचा आपण सर्वंजन प्रयत्न करू या.

आपणा सर्वांना उज्वल कार्यासाठी शुभेच्छा.

श्री. दत्ताराम राजाराम रामदासी (मुख्याध्यापक)
म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड