मराठी साहित्यातील ज्येष्ठ कथाकार शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रशालेत दि ३१ जुलै २०२६ रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शंकर पाटील यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे तसेच त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे हा होता.
प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सौ. गद्रे मॅडम, सौ. चिंबळकर मॅडम आणि सौ. माहुरकर मॅडम सौ. बसाळे मॅडम यांनी इयत्ता सातवीच्या सर्व वर्गांमध्ये शंकर पाटील यांच्या जीवनावर आधारित गोष्टींचे कथाकथन स्वरूपात वाचन करून दाखवले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर शंकर पाटील यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि त्यांच्या साहित्यवैभवाची प्रभावी मांडणी केली.
तसेच जुनियर कॉलेजच्या वर्गामध्ये ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शंकर पाटलांच्या ‘नाटक’ या कथेचे सादरीकरण प्रशालेच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका सौ .स्नेहल देशपांडे मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी कथाकथन अत्यंत उत्साहाने व एकाग्रतेने ऐकले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शंकर पाटील यांच्या साहित्याची ओळख झाली तसेच पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळाली. अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरला.
प्रशालेच्या माजी शिक्षिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी झाला. त्यांच्या मौल्यवान सहभागाबद्दल प्रशालेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

