लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील शिक्षक देशराज कोळंबे , संगीता रामदासी, संगीता रिकामे, चंद्रकांत भोकटे , सूर्यकांत खैरनार, माने.एस. ए. तसेच सेवक महादेव भांडवलकर,वैभव म्हेत्रे ,शारदा सोळंके यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले.

इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी अनुप्रिया पाडळकर हिने लोकमान्य टिळकांच्या  ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची आठवण करून दिली. टिळकांनी केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून पेटवलेली वैचारिक क्रांतीची ज्वाला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडवून आणलेली लोकजागृती यांचे प्रभावशाली चित्र तिने आपल्या भाषणातून उभे केले.

इयत्ता आठवीतील अक्षरा उघडे या विद्यार्थिनीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा आढावा घेतला. ‘माझी मैना गावाकडं राहिली’ यासारख्या लावण्यांमधून आणि ‘फकिरा’ सारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी शोषित-पीडितांचे दुःख जगासमोर कसे मांडले, याचे भावपूर्ण वर्णन तिने मनोगतामध्ये केले

संगीता रिकामे यांनी आपल्या प्रबोधनामध्ये मुलांना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक  यांच्या कार्याविषयीची माहिती सांगितली.लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णा भाऊ साठे यांची सामाजिक बांधिलकी हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. ‘या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल’ असा उपदेश त्यांनी मुलांना केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी केले.

Scroll to Top