लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम

स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज दि. 23 जुलै 2026 रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” हा त्यांचा सिंहनाद आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती जागृत करतो. नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्या शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

५ वी बोधगया वर्गातील सुरभी खोचरे, इ. ६ वी तक्षशिला वर्गांमधील जय जगताप, सृष्टी चव्हाण तसेच कृष्णा बेंगळे यांनी लो.टिळकांच्या वेशभूषेत व खणखणीत आवाजात भाषण केले.

उपमुख्याध्यापक सुरवसे सर यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य,निडर नेतृत्वाने आणि जनमानसातील आदरामुळे त्यांना मिळालेली ‘लोकमान्य’ ही पदवी, ब्रिटिश अधिकारी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” का म्हणत अशा अनेक गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ६ वी तक्षशिला मधील  शुभ्रा जगताप हिने केले तर  आभारप्रदर्शन दूर्वा मरळ या विद्यार्थीनींने केले.

सौ. घोलप व सौ.सहारे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले.

या जयंती कार्यक्रमामुळे  विद्यार्थ्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या एका थोर नेत्याचा आदर्श समजला.

Scroll to Top