भारतात सर्वत्र २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज दिनांक २७ जुलै २०२६ रोजी आपल्या प्रशालेतही हा दिवस साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लहाने सर यांनी केले.
१९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला. त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपल्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताचा विजय साजरा करण्यासाठी, २६ जुलै रोजी भारतात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो अशी माहिती सरांनी सांगितली. यानंतर शिवम सचिन जगताप, श्रेयस सचिन वाघोले सुरभी तुकाराम खोचरे या पाचवीतील विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धासंदर्भात आणखी माहिती सांगितली.
इयत्ता सातवीमधील आर्या पोमण या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम, भारतीय सैनिकांबद्दल अस्मिता जागृत करण्याचे काम या कार्यक्रमाने केले.कार्यक्रमाचे नियोजन महिना प्रमुख सौ.सहारे व सौ. घोलप यांनी केले होते.

