विद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षिका सौ. अर्चना लडकत, प्रमुख वक्ते श्री. शंकर विभाड, श्री. अभिजित तोडकर तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता रिकामे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्त्व स्पष्ट करत “Sound mind in a sound body” या विचारातून खेळ आणि आरोग्य यांचा अतूट संबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
यानंतर श्री. सूर्यकांत खैरनार यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. अर्चना लडकत यांनी प्रमुख वक्ते श्री. शंकर विभाड व श्री. अभिजित तोडकर यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
प्रमुख अतिथी श्री. शंकर विभाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून मेजर ध्यानचंद यांना “हॉकीचे जादूगार” का म्हटले जाते, हे त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग व गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार शारीरिक शिक्षणाला मिळणाऱ्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आरोग्याकडेही अधिक लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये खेळ, आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडाभावना यांविषयी जागृती निर्माण झाली. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना निरोगी शरीर आणि प्रसन्न मनाचे महत्त्व समजले.

