प्रशालेत दि २९ ऑगस्ट रोजी विश्वसंस्कृतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे आणि पर्यवेक्षिका सौ अर्चना लडकत आणि संस्कृत शिक्षक श्री अभिजित तोडकर यांची उपस्थिती होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी तक्षशिला या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का खटाटे हिने संस्कृतमधून केले. इयत्ता दहावी तक्षशिला आणि नालंदा तसेच इयत्ता नववी तक्षशिला या वर्गांमधील अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. त्यातून त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृतमधील वेदवाङ्मय, पंचमहाकाव्ये , सुभाषिते, संस्कृतच्या प्रसार आणि प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करणाऱ्या संस्कृत भारती ही संस्था या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ते विद्यार्थी आणि त्यांनी मांडलेले विषय पुढील प्रमाणे आहेत–
१) संस्कृत दिनाचे महत्त्व–चि सोहम कुरकुटे
२) संस्कृत भाषेचे महत्त्व– कु स्मृती गीते
३) संस्कृत सुभाषिते — चि सार्थक लोखंडे
४) संस्कृतमधील वेदवाङ्मय–कु अनघा जगताप
५) संस्कृतमधील पंचमहाकाव्ये–कु सई बडधे
६) पंचतंत्रातील कथा– चि वरद गायकवाड
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संस्कृत शिक्षक श्री अभिजित तोडकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळविण्याचा विषय म्हणून संस्कृतकडे न पाहता आपल्या व्यक्तिमत्त्वाला उत्तम वळण देण्याचे साधन म्हणून संस्कृतचा अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.


