दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विद्यालयात सकाळ आणि दुपार अशा दोन्ही विभागात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. शंतनु सुरवसे प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण उपस्थित होते.
सकाळ विभागातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ.प्रज्ञा पोटेगांवकर यांनी केले. स्वराली कामथे
सृष्टी चव्हाण या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. अनन्या भिसे , शाल्मली पाठक या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त गीतगायन केले तर मुग्धा तुंगार हिने तबला वादन केले.
यानंतर विद्यार्थींनी व महिला शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधल्या. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रशालेच्या परिसरातील झाडांना राख्या बांधण्यात आल्या. प्रशालेच्या परिसरातील पिंपळाच्या झाडाला उपमुख्याध्यापक श्री.शंतनू सुरवसे व ज्येष्ठ शिक्षक श्री. हिरामण सहारे यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली
त्यानंतर प्रशालेतील ज्यूनियर काॅलेजचे प्राध्यापक श्री. नामदेव कोऱ्हाळे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनि विद्यार्थ्यांसमोर पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. श्री. कोऱ्हाळे यांच्या विषयी उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे ज्येष्ठ शिक्षक श्री सहारे सर यांनी मनोगते व्यक्त केली
तसेच श्री. कोऱ्हाळे सरांनीही आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ. गावीत मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे शिक्षक श्री. खळदकर सर यांनी मानले.
दुपार विभागातील कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. संगीता रिकामे यांनी रक्षाबंधन उत्सवामागील संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. महाभारतातील श्रीकृष्ण व द्रौपदी यांचे बहिण भावांचे नाते, चित्तोडची राणी कर्णावती व हुमायूं राजा यांचे बहिण भावांचे नाते त्यांनी गोष्टींद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडले.
श्री. मच्छिंद्र फडतरे यांनी रक्षाबंधनावर आधारित गीते विद्यार्थ्यांना ऐकवली.याननतर सर्व मुलींनी व महिला शिक्षिकांनी प्रशालेतील मुलांचे व शिक्षकांचे औक्षण करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या होत्या. राखी तयार करण्याचे मार्गदर्शन प्रशालेतील कलाशिक्षक श्री.अमित पाटील, श्री. उमेश पवार, श्रीमती राजगौरी जगताप, सौ. चित्रा सहारे यांनी केले होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र कांबळे यांनी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यात बहीण- भावांचे नाते वृद्धिगंत करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. संगीता रिकामे व श्री. सूर्यकांत खैरनार यांनी केले होते.


