दिनांक २९ जुलै २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड या प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त “शालामाता कृतज्ञता अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी रोटरी क्लब चे अध्यक्ष मा. डॉ. संदीप टिळेकर, सासवड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मा. श्री. मिलिंद इनामके, वरद टोपोग्राफिकल मॅपिंग सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. मनोज बोरकर,मा. ॲड. श्री.रामदास भोसले, मा. श्री.व सौ स्नेह ल श्रीकांत देशपांडे ,श्रीमती इंदुमती दाते त्याचबरोबर विविध बॅचचे माजी विद्यार्थी,आजी शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गुरुवंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. अर्चना लडकत यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. संदीप टिळेकर,मनोज बोरकर, यांनी आपल्या मनोगतामध्ये शालेय जुन्या आठवणींना उजाळा दिला व शाळेतील शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या. शाळेने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले त्यामुळे आज ते या पदापर्यंत पोहोचले हे सांगितले. प्रशालेचे माजी ज्येष्ठ शिक्षक मा. श्री.श्रीकांत देशपांडे यांनी व्यास मुनींविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करावे असा संदेश दिला.
यानंतर माजी विद्यार्थ्यांनी ३२००० रुपयांचा कृतज्ञता निधी समर्पण केला. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचे उपमुख्याध्यापक मा. शंतनू सुरवसे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच प्रशालेला सहकार्य असल्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणे शक्य होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेबाबतची आपुलकी अशीच वाढत रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रशालेच्या शिक्षिका सौ. अश्विनी सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता रिकामे यांनी केले.

