विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, हस्तकौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विदयालयात मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले गेले.
प्रशालेतील दुपार विभागाच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. चित्रा सहारे, रुपाली घोलप, प्रज्ञा पोटेगावकर, विद्या बंड, दीपाली लांडगे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम केले.
या स्पर्धेचे नियोजन संगीता रिकामे, रिबेका गावीत व वर्षा जगताप यांनी केले. या उपक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी मार्गदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत इयत्तेनुसार प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेले विद्यार्थी
१) ५ वी – आरोही सागर भिसे.
२) ६ वी- कृष्णानंदी सुनील जगताप
३) ७ वी-स्वराली सुखदेव झेंडे
४) ८ वी- पूर्वा हरिश्चंद्र गायकवाड आणि कार्तिक गोकुळ हिप्परकर (विभागून)
५) इ.९ वी- युगंधरा वीरेंद्र हेंद्रे आणि जान्हवी नितीन पोटे (विभागून)
६) १० वी- राजलक्ष्मी संजय काकडेआणि रिझा इमरान बागवान (विभागून)


