वाघीरे माध्यमिक विद्यालयातून इयत्ता ७ वीच्या स्ॉलरशिप परीक्षेसाठी एकूण ६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २५ विद्यार्थी पात्र ठरले. परीक्षेचा शेकडा निकाल – ४१.६७ % इतका लागला.
या परीक्षेत पुढील सहा विद्यार्थ्यांनी ३०० पैकी २०० पेक्षा अधिक गुण मिळवले
१) शेट्टी सिद्धी सुरेश- (२४४ गुण)
२) हिप्परकर कार्तिक गोकुळ- (२३४ गुण)
३) कुंजीर वेदांत दत्तात्रेय- (२२६ गुण)
४) निरगुडे तनिष्क संतोष- (२२४ गुण)
५) तोडकर शुभंकर अभिजित- (२१० गुण)
६) चि. जांभळे ओम गणेश- (२०६ गुण)
यापैकी पुढील चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
१) शेट्टी सिद्धी सुरेश (रँक १५६)
२) हिप्परकर कार्तिक गोकुळ (रँक २४९)
३) कुंजीर वेदांत दत्तात्रय (रँक ३४०)
४) निरगुडे तनिष्क संतोष (रँक ३७०)
या विद्यार्थ्यांना रूपाली घोलप ,वर्षा जगताप, अश्विनी सावंत, संगीता केंगले आणि चित्रा सहारे या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले होते.
दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे पेढे व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, शालेय पदाधिकारी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

