माजी विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या गुणवंतांचा सत्कार

म. ए. सो. वाघीरे विद्यालयाच्या १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी  मार्च २०२६  च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी एका विशेष गुणगौरव सोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन केले.  या दिमाखदार सोहळ्यात १९८८ बॅचचे तब्बल ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे यांनी भूषवले. उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे, बालविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडदे  आणि बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा जांभळे हे सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.
१८८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. सुषमा न्हालवे या सध्या याच विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांनी या मेळाव्यासाठी  समन्वयक  म्हणून जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली राऊत-भुजबळ (DySP, नाशिक जिल्हा) यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमात एक चैतन्यमय वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमात २०२६ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
जुनी शाळा, आदरणीय गुरुजन, बालपणीच्या मित्रमैत्रिणी यांची पुनर्भेट तसेच  शाळेच्या रम्य आठवणी अशा सुखद अनुभवांनी भारलेला हा सोहळा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
Scroll to Top