म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. पुणे च्या वतीने 26 kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर
बुधवार दि. 10/12/2025 रोजी भारत फोर्ज कं. लि. CSR फंडाच्या प्रमुख मा. डॉ.लिनाताई देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली.
या कंपनीच्या वतीने म. ए. सो. वाघीरे विद्यालयास 26kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला. याचे काम एक दोन दिवसात सुरू होणार आहे. या कामासाठी पुरंदर तालुक्याचे जल दूत व सामाजिक कार्यकर्ते मा. सागरतात्या काळे, कंपनीचे समन्वयक जयदीप लाड, प्रशालेचे पालक मा.श्री.अमित काळे, मा. श्री. अमोल बंड, सौ. संगीता रिकामे, सौ. विद्या राऊत( बंड), चि. रोहन दहितुले यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला.
मा. डॉ. लिनाताई देशपांडे यांनी शाळे बद्दलची माहिती घेतली व तसेच पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. पूजा जोग, मा. पर्यवेक्षिका सौ. अर्चना लड़कत, संस्थेचे प्रतिनिधी श्री. दुसाने सौ. संगीता रिकामे, सौ. विद्या बंड हे उपस्थित होते.
