सासवड :
आज रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन सासवड येथे झाले. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात टाळ – मृदूंगाच्या गजरात स्वागत केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका सौ.अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई इ. संताच्या केलेल्या वेशभूषाने वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या दिंडी नृत्याचे प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन विद्यालयातील शिक्षक श्री. मच्छिन्द्र फडतरे व श्री. शिवहार लहाने यांनी केले होते. या विद्यार्थी दिंडी सोहळ्यात बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक आनंदाने सहभागी झाले होते. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक हे सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत वारकरी नृत्य आणि वारकरी रिंगणामध्ये सहभागी झाले होते . शिक्षक पालक यांनी देखील नाचत गात फुगड्या खेळत या आनंद उत्सवात सहभाग घेतला .
🚩🚩🚩🚩🚩
