News

म.ए.सो. वाघीरे विद्यालय सासवड मधील १४ वर्षीखालील मुलांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.

राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा हिंगोली वसमत या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेत आपल्या म.ए.सो. वाघीरे विद्यालय सासवड मधील १४ वर्षीखालील मुलांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.

इ. ७ वीतील चि. सर्वेश लवांडे याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या प्रशालेतील चि. सर्वेश सचिन लवांडे इयत्ता 7 वी याची जिल्ह्यातून 2 रा क्रमांक येऊन राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान या अंतर्गत सर्वेशने आपत्ती सूचक उपकरण तयार केले होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

म.ए.सो.वाघीरे विद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाघीरे संकुलातील मराठी माध्यमाचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विभाग तसेच इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळा या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या शाला …

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन Read More »

चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती येथे आज गुरुवार दि ५-१२-२०२४ रोजी संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु.स्वप्नाली पोमण, चि मयूरेश चिंचोलीकर आणि चि तन्मय म्हेत्रे हे इयत्ता ९ वी मधील तीन विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेसाठी १०० सुभाषितांचे पाठांतर आणि त्यांचा अर्थ सांगणे अपेक्षित होते. स्पर्धेत एकूण विविध शाळांच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग …

चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. Read More »

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये  स्वामी विवेकानंद जयंतीच्या  निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद कोळसुने व त्यांच्या परिवाराने, कै आशिष कोळसुने यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या स्वामी विवेकानंदांचे विचार आणि जीवन यांची माहिती देणाऱ्या २५०० …

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Read More »

बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे नागपुर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कु. तन्मयी कोकरे (कॅप्टन) व कु.स्वरा इनामके या वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या संघातून खेळल्या. या संघाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला.

बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे नागपुर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कु. तन्मयी कोकरे (कॅप्टन) व कु.स्वरा इनामके या वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या संघातून खेळल्या. या संघाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला.