शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म ए सो वाघीरे विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सासवड येथील वाघीरे विद्यालय आपल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांबद्दल विख्यात आहे.शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यालयाने पुरंदर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धा दि ११ ऑक्टोबर रोजी पार पडल्या.पुरंदर तालुक्यातील ३५ शाळांमधले एकूण ७३ स्पर्धक या स्पर्धेला उपस्थित होते.स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक श्री.नंदकुमार सागर आणि पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.दिलीप नेवसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रोहिदास भारमळ यांनी केले. सूत्रसंचालन श्री.शिवहार लहाने तर आभारप्रदर्शन सौ.संगीता केंगले यांनी केले.स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी श्री.संजय काटकर , श्री.विठ्ठल गुरव , डॉ.सुभाष तळेकर आणि सौ.गीता पुरंदरे यांनी पार पाडली. स्पर्धेमध्ये विविध गटांमध्ये क्रमांक मिळवलेले विद्यार्थी असे आहेत–

 

  • गट १ –पाचवी ते सातवी

✓ प्रथम क्रमांक–कु.आर्या मोरे (शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूल, सासवड)

✓ द्वितीय क्रमांक–चि.आयुष शिर्के (माध्यमिक विद्यालय , मांढर)

✓ तृतीय क्रमांक–चि.ईशान कटके (कानिफनाथ विद्यालय,भिवरी)

  • गट २– आठवी ते दहावी

✓ प्रथम क्रमांक–चि.अथर्व होले (महात्मा फुले विद्यालय, खानवडी)

✓ द्वितीय क्रमांक–इन्द्रनील दरेकर (शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूल, सासवड)

✓ तृतीय क्रमांक–कु.सानिका माने (डॉ.पतंगराव कदम विद्यालय,दौंडज)

  • गट ३–अकरावी,बारावी

✓ प्रथम क्रमांक–कु.ईश्वरी बोरुडे (शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूल, सासवड)

✓ द्वितीय क्रमांक–चि.कुणाल म्हस्के (पुरंदर ज्युनिअर कॉलेज,सासवड)

✓ तृतीय क्रमांक–कु.नियती खेडेकर (म.ए.सो.वाघीरे ज्युनिअर कॉलेज,सासवड)

 

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी श्री. मार्तण्ड देवस्थान समिती (जेजुरी) चे सल्लागार आणि विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे धर्मप्रचार प्रमुख श्री.राजाभाऊ चौधरी आणि पुरंदर तालुका विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्री.प्रशांत शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.श्री.राजाभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नातून श्री.मार्तण्ड देवस्थान समितीतर्फे वाघीरे विद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेच्या या उपक्रमासाठी १५,००० रुपयांची देणगी देण्यात आली. याशिवाय परीक्षक डॉ.सुभाष तळेकर यांचे अमेरिकेत वास्तव्यास असणारे सुपुत्र आणि वाघीरे प्रशालेचे माजी विद्यार्थी  डॉ. राहुल तळेकर यांनीही बक्षिसाची रक्कम या स्वरूपात ४५०० रुपयांची देणगी विद्यालयास दिली.पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रोहिदास भारमळ यांनी केले. श्री.शिवहार लहाने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. श्री. राजाभाऊ चौधरी यांनी विद्यालयाच्या नावीन्यपूर्ण वक्तृत्व स्पर्धेच्या या उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले. स्पर्धांच्या पारितोषिकांचे वाचन श्री.अभिजित तोडकर यांनी केले.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ.वर्षा जगताप यांनी सांभाळली तर आभारप्रदर्शन सौ.संगीता रामदासी यांनी केले.

Leave a Comment