चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती येथे आज गुरुवार दि ५-१२-२०२४ रोजी संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु.स्वप्नाली पोमण, चि मयूरेश चिंचोलीकर आणि चि तन्मय म्हेत्रे हे इयत्ता ९ वी मधील तीन विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेसाठी १०० सुभाषितांचे पाठांतर आणि त्यांचा अर्थ सांगणे अपेक्षित होते. स्पर्धेत एकूण विविध शाळांच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविला.

Leave a Comment