सासवडच्या कन्येची बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघात निवड.

 

सासवड, दि. ४ : येथील म. ए. सो. वाघीरे विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्वरा योगेश इनामके हिची भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे मालदीव येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळणार आहे. तमिळनाडू मधील इरोड येथे
येथे येथे नुकत्याच झालेल्या ७० व्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत तिने महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कु. स्वरा हिने या पूर्वी अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. तिच्या मुळे वाघीरे विद्यालयाला सलग तीन वर्षे बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे.तिला स्टार ऑफ द इंडिया हा ‘किताब दोनदा मिळाला आहे

भारतीय संघात निवड झालेली कु. स्वरा ही सासवडसारख्या ग्रामीण भागातील पहिलीच खेळाडू आहे. तिच्या या यशाबदल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Scroll to Top