शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये म.ए.सो.वाघीरे विद्यालयाचे सुयश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी अशा दोन इयत्तांकरिता शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करण्यात येते. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयाने अतिशय उत्तम यश संपादन केले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च-प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यालयातील एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी पात्र झाले असून एकूण ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
चि. तनिष्क संतोष निरगुडे (रँक २१८) , कु. देवांशी हरिकिशन दराडे (रँक २१८), कु. सिद्धी सुरेश शेट्टी (रँक २३२) चि.वेदांत दत्तात्रेय कुंजीर (रँक २४२), आणि चि. कार्तिक गोकुळ हिप्परकर (रँक २४४) अशी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक श्री आप्पासाहेब कोकरे, श्री शिवहार लहाने, श्री. गणेश पाठक आणि श्री.संजय कापरे यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८ विद्यार्थी पात्र ठरलेले असून कु. समृद्धी घनश्याम वणवे (रँक १२६) कु. स्वप्नाली लहू पोमण (रँक २९४) आणि कु. श्रावणी गोरक्ष खेडेकर (रँक २९५) या तीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना श्री. अशोक जाधवर, सौ संगीता रिकामे ,सौ संगीता रामदासी आणि सौ स्नेहल मुद्गल या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शाला समितीचे अध्यक्ष श्री. सागर नेवसे, महामात्र श्री.सुधीर भोसले, मुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे आणि प्रभारी पर्यवेक्षक श्री. शंकर विभाड या विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Comment