महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाघीरे संकुलातील मराठी माध्यमाचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विभाग तसेच इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळा या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सहसचिव सुधीर भोसले उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांनी भूषविले. बाल विकास मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर आणि पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली क्षीरसागर या सर्व मान्यवरांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.