आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. म. ए. सो. वाघीरे विद्यालय सासवड येथे योग दिन मोठ्या उत्साहाने एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. योगसाधना आणि योग तपश्चर्याचा संदेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी यांनी आपल्या प्रस्ताविकेतून विद्यार्थ्यांना दिला.
स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी केवळ एक दिवसांपुरती योगासने न करता दैनंदिन जीवनातही योगासनं करण्याचा सल्ला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा भारती पुणे महानगराचे अध्यक्ष व म.ए.सो.क्रीडावर्धिनीचे समन्वयक श्री. शैलेश आपटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागचा इतिहास विद्यालयातील शिक्षक श्री. अभिजित तोडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
योगविद्या केंद्र, सासवड चे प्रमुख डॉ. घनश्याम खांडेकर यांनी योग व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमवेत केले.
तसेच विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व सांगितले.
यावेळी म.ए.सो.क्रीडावर्धिनीचे वाघीरे विद्यालयाचे समन्वयक डॉ.निर्भय पिंपळे, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे पर्यवेक्षक श्री. शंकर विभाड, क्रीडा शिक्षक श्री. गणेश खळदकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. गणेश हिले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हिरामण सहारे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. शंकर विभाड यांनी मानले.

Leave a Comment