2025-26
विद्यालयाचे नवीन शैक्षणिक वर्ष आज सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी सुरू झाले. शैक्षणिक वर्षाच्या आरंभी सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयातील शिक्षकांनी उत्तम काम करण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी सकाळ वृत्तसमूहामध्ये कार्य करणारे श्री संदीप वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ अर्चना लडकत यांनी केले.
त्यानंतर शिक्षकांनी शैक्षणिक वर्षांमध्ये आपल्या नेहमीच्या शिकविण्याच्या कामाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कोणते विशेष उपक्रम राबवणार आहोत याची माहिती शाळेकडे लिखित स्वरूपामध्ये सादर केली. ती कोणत्या स्वरूपात सादर करायची आहे याचा आराखडा विद्यालयाचे शिक्षक श्री सूर्यकांत खैरनार यांनी शिक्षकांना सांगितला.
विद्यालयाच्या शिक्षिका मंगल कोकरे यांनी शिक्षकांनी वर्षभरासाठी घ्यायच्या संकल्पाचे वाचन केले त्यामागून सर्व शिक्षकांनी त्याचे उच्चारण केले.
श्री शिवहार लहाने यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे श्री संदीप वाघ यांनी या विशेष उपक्रमाची आपल्या भाषणामध्ये प्रशंसा केली. अशाप्रकारे विशिष्ट संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळा दुर्मिळ आहेत असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपला हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याकरता तन-मन-धनाने प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्ताराम रामदासी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री शंतनू सुरवसे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यालयाचे शिक्षक श्री प्रमोद ठुबे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिक्षकांचा आदर केला पाहिजे - बाबाराजे जाधवराव
म.ए.सो.वाघीरे विद्यालय, सासवड येथे विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव'
सासवड :
म.ए.सो.वाघीरे विद्यालय, सासवड येथे आज १६ जून रोजी शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रवेशोत्सव' कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास पुरंदर भाजपा चे जेष्ठ नेते बाबाराजे जाधवराव
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिक्षकांचा आदर केला पाहिजे, शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात असे मत त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर रोज दहा इंग्रजी वर्तमानपत्र देण्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली. माजी राज्यमंत्री दादाराव जाधवराव हे त्यांचे वडील या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने या शाळेबद्दल आमचे आपुलकीचे नाते असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उन्हाळी सुट्टीच्या कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प व शालेय पाठ्यपुस्तके देऊन मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. गुलाबपुष्पाने मुलांचे चेहरे खुलले. नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन शाळा, नवीन शिक्षक यामुळे इयत्ता पाचवीमध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे उत्साहाने खूलून गेले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.दत्ताराम रामदासी व उपमुख्यद्यापक श्री.शंतनू सुरवसे यांनी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा परिचय शिक्षक शिवहार लहाने यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका रुपाली घोलप यांनी केले. यावेळी जेष्ठ क्रीडा शिक्षक हिरामण सहारे आदी उपस्थित होते.
म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे दिंडी प्रमुखांचा सन्मान
(सासवड) :
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या १६ दिंड्या म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे दोन दिवस निवासासाठी असतात. प्रतिवर्षाप्रमाणे दिंडी प्रमुखांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात येतो. दिंडी प्रमुखांचा सन्मान सोमवार दिनांक २३ जून २०२५ रोजी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेचे शाला समिती अध्यक्ष, जेष्ठ विधिज्ञ श्री. सागरजी नेवसे, सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री. संजयजी पाचपोर तसेच निसर्ग दिंडीचे प्रमुख श्री. प्रशांतजी अवचट तसेच जनअदालत संस्थेचे पदाधिकारी वकील आवर्जून यावेळी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी सांप्रदायाचे योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. निसर्ग दिंडीचे प्रमुख श्री.प्रशांतजी अवचट यांनी प्लास्टिक मुक्त दिंडी या विषयावर मार्गदर्शन केले पळसाच्या पानांची पत्रावळ वारीत वापरण्याचा सल्ला यांनी यावेळी दिला. सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री. संजयजी पाचपोर यांनी वारीची परंपरा व पर्यावरण संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. शाला समिती अध्यक्ष श्री.सागरजी नेवसे यांनी शाळेच्या इतिहासाबद्दल वारकऱ्यांना माहिती दिली. संस्थेच्या व शाळेच्या वतीने वारकऱ्यांचे त्यांनी यावेळी स्वागत केले. गेली अनेक वर्ष वारीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांचे त्यांनी यावेळी कौतुक केले तसेच वारकऱ्यांना वारीतील पुढील प्रवासासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सर्व दिंडी प्रमुखांचा सन्मान शाळेचा वार्षिक अंक व श्रीफळ देऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आला. दिंडी प्रमुखांनी दिंडीत यापुढे पर्यावरण पूरक पत्रावळी वापरण्याचा संकल्प यावेळी केला. उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांसोबत महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.मच्छिंद्र फडतरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय शिक्षक श्री. शिवहार लहाने यांनी करून दिला. जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री. हिरामण सहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज भक्तिमय वातावरणात सासवड येथे स्वागत केले.
सासवड :
आज रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन सासवड येथे झाले. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात टाळ - मृदूंगाच्या गजरात स्वागत केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका सौ.अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल - रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई इ. संताच्या केलेल्या वेशभूषाने वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या दिंडी नृत्याचे प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन विद्यालयातील शिक्षक श्री. मच्छिन्द्र फडतरे व श्री. शिवहार लहाने यांनी केले होते. या विद्यार्थी दिंडी सोहळ्यात बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक आनंदाने सहभागी झाले होते. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक हे सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत वारकरी नृत्य आणि वारकरी रिंगणामध्ये सहभागी झाले होते . शिक्षक पालक यांनी देखील नाचत गात फुगड्या खेळत या आनंद उत्सवात सहभाग घेतला .
🚩🚩🚩🚩🚩
म. ए. सो. वाघीरे संकुलामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. या संकुलातील म.ए. सो. परिवारातील सर्व शाखांचा सहभाग होता.ठीक 7.30 वाजता म.ए.सो. वाघीरे प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. अलका कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व्यासपीठावर म.ए.सो.वाघीरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. पूजा जोग ,उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका श्रीमती.अर्चना लडकत , म.ए.सो.बालविकास मंदिर या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भाऊ साहेब बडदे , म. ए.सो.पूर्व प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मेघा जांभळे, म.ए.सो.इंग्लिश मिडीयम प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कल्पना नागनूर पर्यवेक्षिका श्रीमती. सरोज बाला व पालक संघाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. एन.सी. सी. प्रमुख श्रीमती. अर्चना उबाळे, स्काऊट गाईड प्रमुख श्रीमती.प्रतिक्षा बोळगे, घोष प्रमुख श्री. मच्छिंद्र फडतरे, श्री. नितीन राऊत, श्री. नितीन ठोंबरे यांच्या पथकांचे निरीक्षण प्रमुख पाहुण्यांनी केले. इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर केली. श्री. हिरामण सहारे, श्री. गणेश खळदकर श्री. नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री. सहारे यांनी केले.या दिवशी वाढदिवस असणाऱ्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या श्रीमती. अलका कारंडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, क्रांतिकारकांच्या गोष्टी, विद्यार्थ्यांनी मोबाईल स्क्रीन टाईम कमी करावा व पुस्तकांचे वाचन करून ज्ञान अद्ययावत करावे असा संदेश दिला.
इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थिनींनी पसायदान नृत्यातून सादर केले.या नृत्याला मार्गदर्शन श्रीमती. निकिता होले यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. राष्ट्रगीत, राज्यगीत, सामुदायिक कवायतीला हार्मोनियमची साथ श्री. भाऊसाहेब बडदे व श्री. योगेश जाधव यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भाऊसाहेब येळे यांनी केले.
दि. 8 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी म.ए.सो. वाघीरे विद्यालयात रक्षाबंधन व संस्कृतदिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी सैनिक मा.प्रशांत रासकर राष्ट्रीय खेळाडू, इंडियन नेव्ही ट्रेनर, सह्याद्री वॉरियर्स अकॅडमी, सासवड. प्रशालेच्या पर्यवेक्षिका मा. सौ. अर्चना लडकत,शंतनु रमेश फडतरे स्टेट लेवल फुटबॉल प्लेअर, कु. रोशनी भूषण निसाद अँथलॅटिक्स राज्यस्तरीय खेळाडू हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी सैनिक प्रशांत रासकर यांनी खेळ, व्यायाम, देशभक्ती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कु. स्वराली भगत हिने संस्कृतदिन याविषयी माहिती सांगितली.प्रशालेच्या शिक्षिका सौ. संगीता रिकामे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. अर्चना लडकत यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशालेतील इ. 5 वी ते इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे माजी सैनिक प्रशांत रासकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. प्रशालेतील सर्व मुला-मुलींनी व शिक्षक- शिक्षिका यांनी भावा - बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन हा सण राख्या बांधून उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रशालेचे उपमुख्याध्यापक मा. श्री. शंतनू सु रवसे,प्रशालेच्या पर्यवेक्षिका मा. सौ.अर्चना लडकत यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सं गीता रिकामे, सौ. रुपाली घोलप, श्री. अशोक जाधवर, श्री. नितीन राऊत यांनी केले.
गुरुवार, दिनांक- 4 सप्टेंबर 2025 रोजी प्रशालेमध्ये सकाळ विभागात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता विद्यार्थी शिक्षक अर्णव दिंधळे सरांनी परिपाठ घेतला. त्यानंतर विद्यार्थिनी मुख्याध्यापिका अनुप्रिया पाडळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीबाबत सूचना दिल्या. विद्यार्थी उपमुख्यद्यापक कार्तिक हिप्परकर यांनी विद्यार्थी शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यवेक्षिका मॅडम तृष्णा बोरकर यांनी सर्व तासिकांचे वर्गवार फिरून निरीक्षण केले.त्यानंतर एक ते चार तास सर्व विद्यार्थी शिक्षकांनी प्रत्येक वर्गावर जाऊन नियोजनबद्ध अध्यापन केले. इयत्ता सातवीचे विद्यार्थी आज शिक्षक म्हणून काम पाहत होते. चार तासानंतर मधली सुट्टी देण्यात आली. ठीक दहा वाजता प्रार्थना चौकामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ व प्रशालेतील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावी तक्षशिला मधील अनघा अमोल गळंगे या विद्यार्थिनीने केले. आजच्या कार्यक्रमाला सौ.स्वाती विवेक पांढरे ( शिक्षिका, इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड ) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुरवसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आजच्या शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर केलेल्या शिस्तबद्ध अध्यापनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या तयारीबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वरी भिसे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीशा टिळेकर व मल्हार सपकाळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आराध्या भुतकर, आर्या गायकवाड या दोन विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त गीत सादर केले. सहावी तक्षशिला व नालंदा या वर्गातील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले या विषयावरती नाटक सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार राजनंदिनी झेंडे या विद्यार्थिनीने मानले. त्यानंतर आजच्या दिवशी शिक्षक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका, श्रीमती. जोग मॅडम,उपमुख्यद्यापक,श्री. सुरवसे सर, आणि पर्यवेक्षिका, श्रीमती. लडकत मॅडम यांचे मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमासाठी लाभले. आजच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती. सहारे मॅडम व श्री. खळदकर सर यांनी केले.
दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी म.ए.सो .वाघीरे विद्यालया मध्ये हिंदी दिन समारोह आयोजित करण्यात आला होता ।संपूर्ण देशभरात हिंदी भाषेचे महत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मता या दृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येतो .
















































