2023-24
शनिवार 23/9/023 रोजी म.सो .वाघीरे विद्यालय सासवड च्या प्रशालेत उत्साहात गणेश विसर्जन झाले. सकाळी ठिक 8.00 वा मा . प्राचार्य श्री रोहिदास भारमळ सर यांच्या शुभहस्ते गणपतीची आरती व पूजा पाठ झाला. ढोल ताशाच्या वाद्यात ही मिरवणूक निघाली .
प्रथमतः प्रशालेचा नावाचा बोर्ड, त्यानंतर विद्यार्थांनी उत्साहाने बसवलेला छबिना* (नयन रम्य पारंपारिक नृत्य सर्वांना आकर्षित करणारे ) त्यांच्या मागे शाळेच्या ( रंगीत ) पी.टी ड्रेस मध्ये सर्व मुले -मुली शिस्तीत एकामागे एक रांगेत गणरायांची घोषणा देत व सासवड शहरातून प्रत्येक चौका चौकात पारंपारिक छबीना नृत्य सादर करीत, गणरायाच्या घोषणा देत प्रशालेच्या मैदानावर विसर्जनासाठी सर्व विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने जमा झाले . त्यावेळी सर्वांसमोर शिक्षका समावेत विद्यार्थ्यांनी छबीना नृत्य अति उत्सहाने सादर करण्यात आले.
शेवटी श्री गणेशाला निरोप दिला. मिरवणूकी मध्ये शिस्त व वहातूक नियंत्रण महत्वाचे असते . ती जबाबादारी प्रशालेच्या NCC च्या दोन्ही ट्रुप प्रमुखांनी NCC कॅडेटच्या मदतीने छान पद्धतीने पार पाडली . शेवटी मुला - मुलींना श्री गणेशाचा प्रसाद व अल्पोपहार देऊन मिरवणूकीची सांगता झाली .
ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या स्वागताचा सोहळा दिनांक 14 /6/2023रोजी संत ज्ञानेश्वरांची आळंदी ते पंढरपूरला जाणारी वारी ,(दिंडी )या दिंडीतील माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी वाघीरे विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी जात असतात . याही वर्षी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शाळेतील जवळजवळ ५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मुलींनी नऊवारी साड्या नेसल्या होत्या, मुलांनी धोतर आणि नेहरू शर्ट परिधान केलेला होता. सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेषांमध्ये येऊन दिंडीचा आनंद घेण्यासाठी हातामध्ये टाळ आणि मुखी पांडुरंगाचे नाम ,ज्ञानोबा तुकाराम चा गजर
,वारकरी चाली तील काही अभंग गात गात या दिंडीमध्ये सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा या बरोबरच संतांचा ही पेहराव केलेला होता .संत ज्ञानेश्वर , या संतांचे पेहराव यासोबतच संत तुकाराम आणि संत नामदेव या संतांची देखील वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या सजीव प्रतीमूर्ती , प्रत्यक्ष मूर्ती वाटाव्यात अशा पद्धतीचा पेहराव एका विद्यार्थ्याने विठ्ठलाच्या रूपात विठ्ठला प्रमाणे केला होता. तर एका विद्यार्थीनीने रुक्मिणीच्या रूपा प्रमाणे पेहराव केलेला होता .
विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख व केंद्रीय सहमंत्री श्री दादाजी वेदक हे देखील या लहान मुलांच्या दिंडीमध्ये सहभागी झाले आणि पांडुरंगाची , ज्ञानेश्वरांची , रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे हार घालून स्वागत व कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत सत्संगातील भजने देखील गायली वाटेने जाणारे हजारो वारकरी या संतांच्या प्रति मूर्तींचे अन् विठ्ठल-रुक्मिणीचे अत्यंत आनंदाने मनोभावे दर्शन करत होते. आणि कौतुकही करत होते . सर्व विद्यार्थी भक्तिरसात दुमदुमलेल्या वारकऱ्यांप्रमाणे मुखाने अभंग आणि माऊलींचा गजर करत होते . ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वाटेवर वाखरी याठिकाणी वारकरी खेळ खेळले जातात ,त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वारकरी खेळ वारकरी अभंगाच्या चालीवर मृदुंगाच्या साथी मध्ये नृत्य करत ( वारकरी नृत्य )आणि फुगडी खेळून हा आनंद साजरा केला. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षिका तसेच काही शिक्षक बंधू वारकरी नृत्या प्रमाणे नृत्य करत फुगड्या खेळले .या दिंडीची जबाबदारी व नियोजन विद्यालयातील श्री फडतरे सर व श्री लहाने सर यांनी केले होते..विद्यार्थ्यांच्या सोबत शाळेतील दोन्ही विभागातील सासवड मध्ये राहणारे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. (श्री फडतरे , श्री लहाने , श्री विभाड ,श्री खैरनार , श्री माळी ,श्री सहारे , श्री तुंगार , श्री कापरे , श्री खळदकर , श्री कोकरे, श्री नितीन ठोंबरे, श्री वैभव म्हेत्रे सौ रिकामे , सौ कोकरे , सौ मुद्गल , सौ रामदासी , सौ . सहारे, सौ . कारंडे, सौ . घोलप , सौ . जगताप ,सौ गावीत हे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . सर्व शिक्षकांनी माऊलींच्या नामाचा गजर करत वारकरी ठेक्यांमध्ये नाचत गात दिंडीचा आनंद लुटला दिंडीच्या आगमनानंतर पुन्हा शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आल्यानंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सासवडमधील म.ए.सो.च्या वाघीरे विद्यालयामध्ये आज दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे सकाळ विभागाचे विद्यार्थी,विद्यालयाच्या एन्.सी.सी. युनिटचे विद्यार्थी आणि सकाळ विभागाचे शिक्षक या सर्वांनी सहभाग घेतला आणि योगासने व प्राणायाम यांचा सराव केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.रोहिदास भारमळ यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
सासवडमधील प्रसिद्ध योगशिक्षक, वैद्य आणि योगविद्या संस्कार केंद्राचे संचालक श्री. घनश्याम खांडेकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख योग-मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.शंतनू सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री.हिरामण सहारे यांनी केले. योग आणि प्राणायाम यांचा सराव नियमितपणे केल्यास शरीर आणि मन यांचे आरोग्य उत्तम राहून निरामय आणि आनंदी जीवन जगता येते हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशालेच्या प्रार्थना मैदानावर* ' ७७ वा स्वातंत्र्यदिन '* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्रथम व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले . यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले आणि ध्वजाला सलामी देण्यात आली . त्याचवेळी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. यानंतर एन.सी.सी. च्या विद्यार्थांनी प्रमुख पाहुण्यांना व राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यानंतर प्रमुख पाहुणे व मानवरांच्या हस्ते आज ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे अशा विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले . यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका कु. प्रतिक्षा बोळगे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते बुके देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्रीयुत राजेंद्र तुळशीराम भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना शब्दरूपी स्वांतत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा
दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांना भारतमातेचे दर्शन घेतल्यानंतर खाऊवाटप करण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्रीयुत राजेंद्र तुळशीराम भोंगळे व माजी पॅरा कमांडो श्रीयुत विकास रामचंद्र धिवार लाभले. तसेच प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत भारमळ सर, आदरणीय
उपमुख्याध्यापक श्रीयुत सुरवसे सर, आदरणीय पर्यवेक्षिका सौ. शुभांगी कांबळे मॅडम , इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. नागनूर मॅडम , बालविकास मंदिर पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जांभळे मॅडम , प्राथमिक च्या
मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम तसेच सर् म.ए . सो . वाघीरे परिवारातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , पालक , हितचिंतक मोण्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांदळकर सर यांनी केले . यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. एकंदरीत कार्यक्रम अतिशय छान पदध्तीने पार पडला .
दि.५ सप्टेंंबर--
सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे आपल्या समाजोपयोगी उपक्रमांकरता प्रसिद्ध आहे. शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने
विद्यालयाने आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विद्यालयामध्ये शिक्षक दिनादिवशी महारक्तदान
शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये साडेतीनशे बॉटल रक्त जमविण्याचा संकल्प विद्यालयाने सोडला
होता. या शिबिरा करता रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या रक्तपेढ्यांशी संपर्क करण्यात आला होता. या तीनही हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स आणि कर्मचारी शिबिरासाठी हजर होते.
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व वाघीरे विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महामात्र श्री. सुधीर भोसले, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. रोहिदास भारमळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री . भाऊसाहेब बडदे, म.ए.सो. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना नागनूर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा जांभळे तसेच तीनही हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री. रोहिदास भारमळ यांनी केले.
त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ. पौर्णिमा राव यांनी आपल्या भाषणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले,तसेच रक्तदानाचे महत्त्व आणि गरज याविषयी उपयुक्त माहिती सांगितली.
शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री. बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये साडेतीनशे बॉटल्स रक्तदान मिळवण्याचा विद्यालयाचा संकल्प यशस्वी व्हावा याकरता विद्यालयाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे यांनी केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शिक्षक श्री.मच्छिंद् फडतरे यांनी पार पाडली.
शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी इयत्ता 5 वी ते 10 वी ची पालकशाळा म.ए.सो. चे वाघिरे विद्यालय सासवड येथे दोन विभागात घेण्यात आली.
इयत्ता 8वी ते 10वीची पालकशाळा सकाळी 10 ते 11:30 या वेळेत घेण्यात आली व इयत्ता 5वी ते 7वीची पालकशाळा दुपारी 3 ते 4:30 या वेळेत घेण्यात आली.
पालक शाळेची सुरुवात परिपाठाने करण्यात आली. परिपाठामध्ये पालकांना प्रार्थना, प्रतिज्ञा,राष्ट्रगीत, बोधकथा घेण्यात आली.प्रशालेचे माननीय नवनियुक्त मुख्याध्यापक श्रीयुत रामदासी सर यांचा सत्कार करण्यात आला.
परिपाठ झाल्यानंतर पालकांना वर्गशिक्षकांमार्फत वर्गात नेण्यात आले. पहिल्या सत्रात पालकांना मूल्यमापन पद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच पालकांना “पाल्याच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांची भुमिका“या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रानंतर पालकांना शाळेची सफर घडवण्यात आली. यामध्ये पालकांना प्रशालेचे भव्य ग्रंथालय,प्रयोगशाळा, संगणकलॅब,अटल टिंकलिंग लॅब,अवकाश निरीक्षण केंद्र, डिजिटल वर्ग दाखविण्यात आले व त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली.
तसेच पालकांना प्रशालेचे माजी विद्यार्थी यांनी केलेल्या सहयोगाने प्रशालेतील वर्ग खोल्या,संगणक कक्ष,प्रयोगशाळा यांचे केलेले नूतनीकरण याविषयी माहिती देण्यात आली
शेवटच्या सत्रात पालकांना आपल्या पाल्याचा सत्र एक चा निकाल वाटप करण्यात आला व आपल्या पाल्याच्या प्रगती विषयी चर्चा करण्यात आली.
अशाप्रकारे माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने व उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या नियोजनाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक शाळा संपन्न झाली.
दिनांक सहा डिसेंबर 2023रोजी विद्यालय सासवड दुपार विभाग दुपारी बारा वाजून पंधरा
मिनिटांनी शाळेच्या प्रार्थना चौक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन
घेण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील आयुष फडतरे व मोरे या
विद्यार्थ्यांनी केली तसेच विद्यार्थ्यांपैकी इयत्ता नववी मधील सायली धारकर व शर्वरी लोणकर
यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता
आठवी मधून कृष्णप्रिया भोसले व जिज्ञासा हिंगणे या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरयांच्या शिक्षणाविषयी व कार्याविषयी माहिती सांगितली तसेच प्रशाचे च्या ज्येष्ठ शिक्षिका
सौ रिकामी मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी व
दूरदृष्टीकोणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सदर कार्यक्रमा साठी प्रशाले च्या पर्यवेक्षिका सौ
कांबळे मॅडम व मुख्याध्यापक श्रीरामदासी सर उपस्थित होते. व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
इयत्ता दहावीतील देशपांडे याविद्यार्थ्याने केले सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे शिक्षक श्रीतुंगार
सर व सौ उबाळे मॅडम यांनी केले होते.
रविवार दिनांक 01/10/2023 रोजी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत "स्वच्छता ही सेवा" अंतर्गत "एक तारीख एक घंटा"
29 ऑगस्ट 2023 रोजी ऑलंपिक वीर -राष्ट्रीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन "राष्ट्रीय क्रीडा दिन " प्रशालेत उत्सहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमांची सुरुवात ऑलंपिक पदक विजेते खेळाडूंचे फोटो व क्रीडा साहित्याचे पूजन करून झाले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा मुख्याध्यापक श्री भारमळ सर यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे डॉ आत्रम सो यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहारा विषयी व मैदानावर होणाऱ्या जखमा व उपचारा विषयी मुलांना माहिती दिली . तसेच दुसरे पाहुणे श्री विभाड सर यांनी मे ध्यानचंद यांच्या खेळातील कौशल्य व बारकावे याची माहिती देऊन विद्यार्थ्याना खेळासाठी प्रोत्साहित केले . खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे . खेळातील निष्ठा - मेहनत - जिदद - देशप्रेम यांची माहिती दिली . यावेळी शाळेतील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांचे आभार क्रीडा शिक्षक श्री खुणे सर यांनी मानले . यावेळी शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते
Activities