2024-25
ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या स्वागताचा सोहळा :
दिनांक 02/07/2024 रोजी संत ज्ञानेश्वरांची आळंदी ते पंढरपूरला जाणारी वारी ,(दिंडी )या दिंडीतील माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी वाघीरे विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी जात असतात . याही वर्षी विद्यालयाचे मा .मुख्याध्यापक श्री - रामदासी सर यांच्या संकल्पनेतुन दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते .
अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शाळेतील जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मुलींनी नऊवारी साड्या नेसल्या होत्या, मुलांनी धोतर आणि नेहरू शर्ट परिधान केलेला होता सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेषांमध्ये येऊन दिंडीचा आनंद घेण्यासाठी हातामध्ये टाळ आणि मुखी पांडुरंगाचे नाम ,ज्ञानोबा तुकाराम चा गजर ,वारकरी चाली तील काही अभंग गात गात या दिंडीमध्ये सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा या बरोबरच संतांचा ही पेहराव केलेला होता संत ज्ञानेश्वर , निवृत्तीनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव या संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या सजीव प्रतीमूर्ती , प्रत्यक्ष मूर्ती वाटाव्यात अशा पद्धतीचा पेहराव एका विद्यार्थ्याने विठ्ठलाच्या रूपात विठ्ठला प्रमाणे केला होता. तर एका विद्यार्थीनीने रुक्मिणीच्या रूपा प्रमाणे पेहराव केलेला होता वाटेने जाणारे हजारो वारकरी या संतांच्या प्रति मूर्तींचे अन् विठ्ठल-रुक्मिणीचे अत्यंत आनंदाने मनोभावे दर्शन करत होते, आणि कौतुकही करत होते . सर्व विद्यार्थी भक्तिरसात दुमदुमलेल्या वारकऱ्यांप्रमाणे मुखाने अभंग आणि माऊलींचा गजर करत होते . ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वाटेवर वाखरी याठिकाणी वारकरी खेळ खेळले जातात ,त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वारकरी खेळ वारकरी अभंगाच्या चालीवर मृदुंगाच्या साथी मध्ये नृत्य करत ( वारकरी नृत्य) आणि फुगडी खेळून हा आनंद साजरा केला. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षिका तसेच काही शिक्षक बंधू वारकरी नृत्या प्रमाणे नृत्य करत फुगड्या खेळले.या दिंडीची जबाबदारी व नियोजन विद्यालयातील दिंडीप्रमुख श्री फडतरे सर व श्री लहाने सर यांनी केले होते. यासाठी आठवडाभर अगोदर पासून मुलांना वारकरी नृत्य , अभंग गायन , नामघोष कसा करावा याचा सराव घेतला गेला या कार्यासाठी आंबोडी गावच्या वारकरी शिक्षण सस्थेतील श्री काळहाणे महाराजांच्या विद्यार्थ्यांनी अभंग गायन , माऊलींचा नामघोष आणि वारकरी नृत्य त्याचबरोबर मृदुंगाची साथ दिली . विद्यार्थ्यांच्या सोबत शाळेतील दोन्ही विभागातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. दिंडीच्या आगमनानंतर पुन्हा शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना
घेऊन आल्यानंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
शनिवार दिनांक २०/७/२०२४ रोजी प्रशालेत सकाळी सात वाजता गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी या कार्यक्रमास प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक उपस्थित होते. माननीय मुख्याध्यापक व प्रभारी पर्यवेक्षक श्री विभाड सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पुजनानंतर इयत्ता दहावी वल्लभी या वर्गातील कु सायली धारकर हिने गुरुपौर्णिमेची अतिशय सुंदर माहिती सांगितली. त्यानंतर सर्व वर्ग प्रतिनिधी, उपवर्ग प्रतिनिधींनी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला. सूत्रसंचालन कु निहारिका वाघोले हिने केले.
विद्यालयामध्ये ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेतीचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे सर व ज्येष्ठ
शिक्षक श्री सहारे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी. शांतता,अहिंसा आणि
सामाजिक न्याय या वाटेवर चालणाऱ्या महात्मा गांधीजींची माहिती प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे
सर तसेच प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगांवकर मॅडम यांनी सांगितली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील
गांधीजींचे योगदान, आजही गांधीजींचे तत्वज्ञान संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारे आहे हे सांगितले.
प्रशालेतील शिक्षक श्री खळदकर सर यांनी आभार मानले व त्यांनी मुलांना जास्तीत जास्त महात्मा गांधी
यांना समजून घेण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके वाचावीत अशी प्रेरणा दिली.
मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी सकाळ विभागात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल
कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे
उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री.सहारे सर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त आपल्या
प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वाचनाचे महत्त्व समजावून
सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आज कोणतेही एक पुस्तक वाचन करावे व त्याची माहिती आपल्या
दैनंदिनीमध्ये लिहून आणावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी सकाळ विभागात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल
कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे
उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री.सहारे सर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त आपल्या
प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वाचनाचे महत्त्व समजावून
सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आज कोणतेही एक पुस्तक वाचन करावे व त्याची माहिती आपल्या
दैनंदिनीमध्ये लिहून आणावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
मिरवणूकी मध्ये शिस्त व वहातूक नियंत्रण महत्वाचे असते .