2024-25
ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या स्वागताचा सोहळा :
दिनांक 02/07/2024 रोजी संत ज्ञानेश्वरांची आळंदी ते पंढरपूरला जाणारी वारी ,(दिंडी )या दिंडीतील माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी वाघीरे विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी जात असतात . याही वर्षी विद्यालयाचे मा .मुख्याध्यापक श्री - रामदासी सर यांच्या संकल्पनेतुन दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते .
अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शाळेतील जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मुलींनी नऊवारी साड्या नेसल्या होत्या, मुलांनी धोतर आणि नेहरू शर्ट परिधान केलेला होता सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेषांमध्ये येऊन दिंडीचा आनंद घेण्यासाठी हातामध्ये टाळ आणि मुखी पांडुरंगाचे नाम ,ज्ञानोबा तुकाराम चा गजर ,वारकरी चाली तील काही अभंग गात गात या दिंडीमध्ये सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा या बरोबरच संतांचा ही पेहराव केलेला होता संत ज्ञानेश्वर , निवृत्तीनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव या संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या सजीव प्रतीमूर्ती , प्रत्यक्ष मूर्ती वाटाव्यात अशा पद्धतीचा पेहराव एका विद्यार्थ्याने विठ्ठलाच्या रूपात विठ्ठला प्रमाणे केला होता. तर एका विद्यार्थीनीने रुक्मिणीच्या रूपा प्रमाणे पेहराव केलेला होता वाटेने जाणारे हजारो वारकरी या संतांच्या प्रति मूर्तींचे अन् विठ्ठल-रुक्मिणीचे अत्यंत आनंदाने मनोभावे दर्शन करत होते, आणि कौतुकही करत होते . सर्व विद्यार्थी भक्तिरसात दुमदुमलेल्या वारकऱ्यांप्रमाणे मुखाने अभंग आणि माऊलींचा गजर करत होते . ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वाटेवर वाखरी याठिकाणी वारकरी खेळ खेळले जातात ,त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वारकरी खेळ वारकरी अभंगाच्या चालीवर मृदुंगाच्या साथी मध्ये नृत्य करत ( वारकरी नृत्य) आणि फुगडी खेळून हा आनंद साजरा केला. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षिका तसेच काही शिक्षक बंधू वारकरी नृत्या प्रमाणे नृत्य करत फुगड्या खेळले.या दिंडीची जबाबदारी व नियोजन विद्यालयातील दिंडीप्रमुख श्री फडतरे सर व श्री लहाने सर यांनी केले होते. यासाठी आठवडाभर अगोदर पासून मुलांना वारकरी नृत्य , अभंग गायन , नामघोष कसा करावा याचा सराव घेतला गेला या कार्यासाठी आंबोडी गावच्या वारकरी शिक्षण सस्थेतील श्री काळहाणे महाराजांच्या विद्यार्थ्यांनी अभंग गायन , माऊलींचा नामघोष आणि वारकरी नृत्य त्याचबरोबर मृदुंगाची साथ दिली . विद्यार्थ्यांच्या सोबत शाळेतील दोन्ही विभागातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. दिंडीच्या आगमनानंतर पुन्हा शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना
घेऊन आल्यानंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
शनिवार दिनांक २०/७/२०२४ रोजी प्रशालेत सकाळी सात वाजता गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी या कार्यक्रमास प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक उपस्थित होते. माननीय मुख्याध्यापक व प्रभारी पर्यवेक्षक श्री विभाड सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पुजनानंतर इयत्ता दहावी वल्लभी या वर्गातील कु सायली धारकर हिने गुरुपौर्णिमेची अतिशय सुंदर माहिती सांगितली. त्यानंतर सर्व वर्ग प्रतिनिधी, उपवर्ग प्रतिनिधींनी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला. सूत्रसंचालन कु निहारिका वाघोले हिने केले.
विद्यालयामध्ये ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेतीचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे सर व ज्येष्ठ
शिक्षक श्री सहारे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी. शांतता,अहिंसा आणि
सामाजिक न्याय या वाटेवर चालणाऱ्या महात्मा गांधीजींची माहिती प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे
सर तसेच प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगांवकर मॅडम यांनी सांगितली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील
गांधीजींचे योगदान, आजही गांधीजींचे तत्वज्ञान संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारे आहे हे सांगितले.
प्रशालेतील शिक्षक श्री खळदकर सर यांनी आभार मानले व त्यांनी मुलांना जास्तीत जास्त महात्मा गांधी
यांना समजून घेण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके वाचावीत अशी प्रेरणा दिली.
मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी सकाळ विभागात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल
कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे
उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री.सहारे सर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त आपल्या
प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वाचनाचे महत्त्व समजावून
सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आज कोणतेही एक पुस्तक वाचन करावे व त्याची माहिती आपल्या
दैनंदिनीमध्ये लिहून आणावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी सकाळ विभागात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल
कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे
उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री.सहारे सर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त आपल्या
प्रशालेतील शिक्षिका सौ. पोटेगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वाचनाचे महत्त्व समजावून
सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आज कोणतेही एक पुस्तक वाचन करावे व त्याची माहिती आपल्या
दैनंदिनीमध्ये लिहून आणावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
मिरवणूकी मध्ये शिस्त व वहातूक नियंत्रण महत्वाचे असते .
प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी बालदिनानिमित्त सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा
दिल्या.स्व.पंडित जवारलाल नेहरू यांच्याविषयी प्रशालेतील इयत्ता-१०वी तक्षशिला या वर्गातील चि.
स्वयम जगताप या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या मनोगतातून स्व.पंडित जवाहरलाल नेहरू
यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाच्या हिताचे व देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान,देशाचा विकास
साध्य करण्यासाठी केलेल्या उपाय योजना आणि त्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी घेतलेले
परिश्रम याबाबत आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
बालक हेच राष्ट्राची भविष्यातील मोठी संपत्ती आहे.म्हणून स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचा
सर्वांगीण विकास,भविष्यातील येणारी आव्हाने दूर कशी करता येतील.याचा विचार करून देशातील सर्व
लोकांना आवश्यक अशा सर्व सोयी-सुविधा व आपल्या देशातील बालकांना आवश्यक अशा सर्व सोयी-
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.मूलभूत हक्क, शिक्षण, सकस आहार ,विविध
खेळ, आरोग्याच्या सोयी सुविधा, क्रीडांगणे,त्याचबरोबर बालकासाठी देशात सर्व सोयी-सुविधा,बालकल्याण
योजना,बालकांचा सर्वांगीण विकास ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करून देश हिताचे प्रभावी
निर्णय घेणारे एक यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो
लहान मुलं हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे.त्यांना लहान मुलं खूप आवडत असे.म्हणून त्यांचा जन्मदिवस
हा संपूर्ण देशभरात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्व.पंडित जवाहरलाल नेहरू हे एक व्यक्ती
नसुन ती एक प्रभावी विचारधारा आहे.
असा संदेश काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रामाणिक
कार्यातून भारतातील असंख्य प्रामाणिक व चारित्र्यसंपन्न व्यक्तींना एक देश विकासाचा वा विचारांचा वारसा
कायमस्वरूपी देऊन जातात.बालदिनाचा हा वारसा पुढेही असाच चालू राहावा.अशी त्यांची ही प्रामाणिक
इच्छा होती.
भारतातील प्रत्येक बालकांला आपल्या आयुष्यातील आनंद मिळावा.ही त्यांची प्रामाणिक इच्छा
होती.त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात
बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या प्रशालेत देखील “ १४ नोव्हेंबर ” बालदिनाचा कार्यक्रम
यशस्वीपणे पार पडला.
भारतीय संविधान दिन 2024-25 म ए सो वाघीरे विद्यालय,सासवड.येथे मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.45 ते 9.45 या वेळेत साजरा करण्यात आला.* सदर कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधानाचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनघा रमेश जगताप इ 7 वी नालंदा या वर्गातील विद्यार्थिनीने केले.प्रास्ताविक प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री सहारे सर यांनी केले.कु तन्वी उमेश पवार इ 5 वी तक्षशिला,कु गार्गी निलेश नाचण इ 6 वी बोधगया व कु अनुप्रिया जयदीप पाडळकर इ 6 वी बोधगया या विद्यार्थिनींनी संविधान दिनाविषयी माहिती सांगितली तसेच प्रशालेचे मा उपमुख्याध्यापक श्री सुरवसे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले.त्यानंतर कु सिद्धी गजरे या विद्यार्थिनीने भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थिनींची कौतुक गुलाब पुष्प व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे. आभार प्रशालेचे कला शिक्षक श्री पवार सर यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रामदासी सर, उपमुख्याध्यापक श्री सुरवसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सहारे सर व श्री पवार सर यांनी केले.तसेच प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री खडसे सर,जेष्ठ शिक्षिका सौ कारंडे मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते. अशाप्रकारे शाळेत संविधान दिन सकाळच्या प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला.
दिनांक 23/12/2024 रोजी प्रशालेत फनी गेम्स घेण्यात आले.माननीय मुख्याध्यापक श्री. रामदासी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.बंड मॅडम यांनी या खेळाचे नियोजन केले. सकाळ विभाग व ज्युनिअर कॉलेज यांच्यासाठी वेळ-दु.11 ते व 2 व दुपार विभाग यांसाठी वेळ-दु.2 ते 4 असे वेळांचे नियोजन केले गेले.विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स मध्ये सात वेगवेगळे खेळ ठेवण्यात आले.कुपन ची किंमत पाच रुपये असून विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दहा रुपये किमतीचा बॉलपेन दिला गेला.या खेळांसाठी विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला व त्यातून त्यांना खूप आनंद मिळाला, या गेम्सचे नियोजन करून ज्या शिक्षकांना व शिक्षकेतरांना जबाबदारी दिली गेली, ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली तसेच सर्वात जास्त सहकार्य स्वयंसेवकांकडून मिळाले.अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात फनी गेम्स पार पडल्या गेल्या.
विद्यालयाचे
उपमुख्याध्यापक श्री. शंतनु सुरवसे, क्रीडा शिक्षक श्री. हिरामण सहारे, सौ. संगीता केंगले, विद्यार्थिनी कु.
अनुप्रिया पाडळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सहावीत शिकणारी
विद्यार्थिनी कु. पूर्वा गायकवाड हिने सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित ओव्यांचे गायन केले. कु. अक्षरा
उघडे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई यांच्या कार्याची
माहिती दिली. मी सावित्रीबाई फुले बोलतेय.. हा एकपात्री प्रयोगातून विद्यार्थिनी कु. अनुप्रिया पाडळकर हिने
सावित्रीबाई यांचे जीवन व कार्याची ओळख करून दिली.
स्ञी शिक्षण व स्ञी हक्कासाठी सावित्रीबाईंनी आयुष्यभर काम केले. समाजातील पहिल्या महिला शिक्षिका
म्हणून त्यांचा आजही सन्मान होत आहे. या सावित्रीबाईंचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावेत यासाठी
सावित्रीबाई जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व उत्तम घडावे यासाठी
विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षिका सौ. रुपाली घोलप यांनी प्रेरणादायक अनुभव सांगितले.
उपमुख्याध्यापक श्री. शंतनु सुरवसे यांनी बालिका दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्ताराम रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री. शिवहार लहाने यांनी केले.
दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत वाघिरे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सासवड शहरातून हातात घोषणा लिहिलेले फलक घेऊन प्रभात फेरी काढली या फेरीमध्ये विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो .सोडा सर्व कामे करा मतदान अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे घोषणा देऊन पूर्ण शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली या फेरीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रामदासी सर पर्यवेक्षिका सौ लडकत मॅडम ह्या देखील उपस्थित होत्या.
दिनांक 4/2/2025 मंगळवार रोजी प्रशालेमध्ये रथ सप्तमीनिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे 12 सूर्यनमस्कार घेण्यात आले. रथसप्तमी या दिवसाचे महत्त्व, आरोग्याच्या दृष्टीने सूर्यनमस्कारांचे महत्त्व प्रशालेतील शिक्षिका सौ.जगताप मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री. खळदकर सर यांनी विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार करून घेतले व सूर्यनमस्कार करण्यामुळे आरोग्याला कसे फायदे होतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या प्रसंगी सर्व शिक्षक व उपमुख्याध्यापक माननीय श्री. सुरवसे सर उपस्थित होते.
दिनांक 18/02/2025 मंगळवार रोजी प्रशालेत सकाळ विभागात आद्य
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी तसेच शिवजयंती साजरी करण्यात
आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील तक्षशिला वर्गातील कु.सिद्धी गजरे
हिने केले. प्रशालेतील शिक्षक श्री लहाने सर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयी
माहिती सांगितली. तसेच विद्यार्थी मनोगत मध्ये कु. अनुप्रिया पाडळकर इयत्ता
6 वी बोधगया, हिने मनोगत व्यक्त केले. शिवजयंती विषयी प्रशालेतील शिक्षिका सौ. प्रिया जगताप यांनी माहिती
सांगितली व विद्यार्थी मनोगत मध्ये शिवराज झेंडे 5 वी तु .वल्लभी , शंभू ताकवले 5 वी तु. बोधगया , स्वरूप पवार इ.7 वी तु.नालंदा या विद्यार्थ्यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सकाळ विभागाचे प्रमुख माननीय उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर हे उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये आठ मार्च या महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सासवड येथील ॲडवोकेट अर्चना कामठे या होत्या. विद्यालयाचे मुख्य मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे आणि पर्यवेक्षिका अर्चना लडकत हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंतनू सुरवसे यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली आणि महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संगीता रिकामे यांनी करून दिला.
यानंतर महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. शिक्षकांच्या तर्फे श्री मच्छिंद्र फडतरे यांनी आपल्या प्रबोधनामध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचे महत्त्व विशद केले.
आपल्या प्रमुख भाषणामध्ये अर्चना कामठे यांनी महिलांच्या हक्कांबाबत प्रबोधन केले व महिलांच्या हक्कांविषयीच्या कायदेशीर तरतुदी सर्वांना समजावून सांगितल्या.
यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक शंकर विभाड यांनी केले.